HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री २ मतदारसघांतून विधानसभा निवडणूक लढविणार ?

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर या विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणाहून लढणार असल्याची माहिती मिळाले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी मुंबईतील एका मतदारसंघाची चाचपणीही करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून दिली आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा हा सुरक्षित पर्याय असल्याचे मानले जात आहे. हा पर्याय त्यांना मान्य झाल्यास मुख्यमंत्री नागपूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. मलबार हिल हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मंतदार संघातून मुख्यमंत्र्यांसाठी योग्य असल्याचे मानले जाते. भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा हा मतदार संघ आहे.

लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर आता भाजप राज्यातील विधानसभा निवडणूकीतही अभूतपूर्व विजय मिळविण्यासाठी कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यात रथयात्राही काढणार असल्याची माहीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. ‘एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार २२० के पार’ या टॅगलाइनसह रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी माहिती दिली आहे. भाजप-शिवसेना २८८ जागांच्या विजयासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्यकर्त्यांच्या नंतर गुन्हे दाखल झाल्याचे सत्र माझ्यापर्यंत आलं तर… पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

News Desk

“पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे”, शिवसेनेचा गौप्यस्फोट

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक नेत्याने चक्क कार्यकर्त्याच्या शेतात केली ऊस लावण!

News Desk