HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (२४ मे) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री म्हणतात..आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..! आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार ?” मग तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करुन दाखवा!”, अशा बोचऱ्या भाषेत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना राजकारण न करण्याचे आवाहनही विरोधी पक्षाला केले. त्याचप्रमाणे, “तुम्ही जरी राजकारण केले तरी आम्ही करणार नाही. आमच्यावर आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे. आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या या राजकारण न करण्याच्या वक्तव्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले कि, “राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का ? काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही..म्हणे “आम्ही करणार म्हणजे करणारच!” कधी? महाराष्ट्र हेच म्हणततोय साहेब आता तरी करुन दाखवा !”

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला संबोधित करताना,”आपल्याला पावसाळ्यापूर्वी कोरोना संपवायचा आहे”, असे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणानंतर हाच धागा पकडत आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “एकदा म्हणता पावसाळ्या पुर्वी कोरोनातून महाराष्ट्राला मुक्त करु…आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार..एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत..आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत…मा.महोदय, रोज भाषण ,दिशा बदलतंय! आता बोलून नको, करुन दाखवा! “, अशीही टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

 

Related posts

“कॉंग्रेस कोणीही संपवू शकत नाही” – धवलसिंह मोहिते पाटील

News Desk

एवढीच जर हिंमत असेल तर २ तास तुमची वर्दी बाजूला ठेवून आमच्याशी भिडा!

News Desk

१० ॲागस्टपर्यंत देशात कोरोनाचे २० लाखांपेक्षा जास्त रूग्ण होतील,राहुल गांधीचा सरकारला इशारा !

Arati More