HW News Marathi
देश / विदेश

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने ऊर्जा मिळाली ! गुलाबराव पाटील

जळगाव | स्वबळ म्हणजे आत्मबल आणि ते आमच्याकडेही आहे हा संदेश आज आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला त्यातून सदैव कामाची ऊर्जा मिळाली , असे आज पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की ,काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला खरा पण त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यावरच आज उद्धव ठाकरे म्हणाले की स्वबळ म्हणजे काही फक्त निवडणुकांपुरते दाखवायचे नसते स्वबळ म्हणजे आत्मबल हे सदैव जोपासायचे असते त्यातूनच आपण समाजाला , देशाला , राज्याला न्याय देण्याची जबाबदारी पेलू शकतो आणि भूमिका जनकल्याणाची घेऊ शकतो.त्यामुळे ते आत्मबल म्हणजे स्वबळ आमच्याकडेही आहे ,हाच त्यांचा आजचा संदेश आम्हाला शिवसैनिकांना वर्षभर ऊर्जा देणारा आहे .सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून आम्ही काय भूमिका घेऊन काम केले पाहिजे , आपली भूमिका न सोडता कसे पुढे गेले पाहिजे हेही पक्षप्रमुखांनी सांगितले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही देशासाठीची भूमिका आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचे हित , ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा दिवंगत शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मंत्र यापुढेही आमच्यासाठी प्रमाण राहणार आहे.उद्धव ठाकरे हे चांगल्या पद्धतीने ३ पक्षांचे सरकार चालवत आहेत महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला हिनवले जाते हे भाई जगताप यांचे वैयक्तिक मत असू शकेल पण मंत्रिमंडळात निर्णय सर्व सहमतीने होतात असेही ते म्हणाले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk

ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीनला अटक

News Desk

भारतात घुसखोरी करण्यासाठी ३०० दहशतवादी प्रयत्नशील | लष्करप्रमुख

News Desk