HW News Marathi
Covid-19

राज्यात मार्च महिन्यात ५५ हजारापेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागण!

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मृतांचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य शासनानेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक नियामांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाविषयी एक नवी माहिती समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात ५५ हजारापेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक

कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २०,४८२ नवे रुग्ण आढळले, तर १९,४२३ कोरोनामुक्त

News Desk

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या

News Desk

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आशिष शेलार यांनी केले स्वागत

News Desk