HW News Marathi
Covid-19

लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता, डॉ. रणदीप गुलेरियांची माहिती

नवी दिल्ली। देशासह राज्यात कोरोनाच थैमान कमी होतय, अर्थातच कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. असं जरी असलं तरी एक संकट दूर होत नाही तोपर्यंत पुढचं संकट ठाण मांडून बसलेले असत. तिसर्‍या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे.

या दरम्यान मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती आता समोर आली आहेएम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये दोन ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोवाक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे. डीसीजीआयने १२ मे रोजी मुलांवर फेज दोन आणि तीन चाचणी घेण्यास भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली की भारत बायोटेकच्या कोवाक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फिझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक असल्याचं ठोस कारण नाही

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी हे नाकारले की, तिसऱ्या लाटेत मुले बाधित होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी म्हटलं की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे या सिद्धांतावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. WHO आणि एम्स यांनी एकत्रितपणे सेरो सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, प्रौढांपेक्षा मुलांचा जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही. दहा हजार प्रस्तावित लोकसंख्या असलेल्या पाच निवडक राज्यांमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. गुलेरिया यांनी मुलांच्या शाळा सुरू करण्यावर विचार करण्यास सांगितल्याच देखील नमूद केलंय. मात्र शैक्षणिक संस्था कोरोनाचे सुपर स्प्रेडर होणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर दुकाने सुरु करणारच ! कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk

Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

News Desk

लसीचे दोन्ही डोस घेऊनही ​​​​​​​केईएम रुग्णालयातील 29 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

News Desk