मुंबई | भारत-चीनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. या घटनेवरून शिवसनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. “चीनने एकही गोळी चालवली नाही. तरीही आमचे २० जवान शहीद झाले आपण काय उत्तर दिले? चीनचे किती सैनिक मारले? चीन आपल्या भूप्रदेशात घुसला आहे का? पंतप्रधानजी, या संकटाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे, पण सत्य काय आहे ते सांगा? काही तरी बोला,” असे ट्वीट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारत घेतले असून मोदींच्या मौनावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रधान मंत्री जी आप शुर और योद्धा हो..आपके नेतृत्त्वमे
देश चीन से बदला लेंगा..— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
संजय राऊत म्हणाले, चीनच्या अरेरावीला कधी सडेतोड उत्तर दिले जाईल का?, चीनने एकही गोळी न चालवली नाही. तरीही आपले २० जवान शहीद झाले. चीनचे किती सैन्या मारले गेले? चीन आपल्या हद्दीत घुसलाय का?, पंतप्रधानजी, या संकट काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, नेमके काय सत्य आहे ते सांगा? काही तरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचे आहे., असा सवाल त्यांनी मोदींना केला आहे. तर राऊतांनी दुसरे ट्वीट करत म्हटले, “मोदीजी, तुम्ही शूर आणि योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदला घेईल का? .