HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईच्या ब्लॅकआऊटमागे चीनचा सायबर हल्ला, देशाला अंधारात टाकण्याचा चीनचा कट होता!

मुंबई | मागील वर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत भारतीय सैनिकांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर चीनने भारतात सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या सायबर हल्ल्याचा संबंध थेट देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही तास झालेल्या ब्लॅकआऊटशी आहे. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यात संपूर्ण शहरातील बत्ती गुल झाली होती आणि ऐन कोरोनाच्या काळात रुग्णालयं जनरेटरवर कार्यरत होती. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे.गलवान हिंसेच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाल्याने लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या. शेअर बाजार ठप्प झाला होता. वीज गेल्याने दोन कोटी मुंबईकर अंधारात होते.

रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जनरेटर सुरु करावा लागले होते, जेणेकरुन व्हेंटिलेटर सुरु राहतील. हा तोच काळ होता, जेव्हा भारतात कोरोना शिखरावर होता.अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर केला जातो त्यामध्ये चीनमधील हॅकर्सने याच भारत चीन संघर्षाच्या काळात मालवेअर इंजेक्ट केला. विशेष म्हणजे द न्यू यॉर्क टाइम्सने हा दावा आता केला असला तरी यापूर्वीही चिनी हॅकर्सचा मुंबईला काळोखात लोटण्यात हात होता अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये अनेक तास वीज नव्हती. सकाळी दहा वाजल्यापासून पुढील अनेक तास अनेक ठिकाणी वीजपुरठवा सुरळीत झाला नव्हता. काही ठिकाणी तर बारा तास उलटल्यानंतरही वीज नव्हती. हा वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेच्या लोकसेवेपासून इतर अनेक सेवांना मोठा फटका बसला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ठाकरे सरकारला तालिबानकडून आदेश येतात का?”, आशिष शेलारांचा सरकारवर हल्ला

News Desk

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar

मंत्र्यांचीही दिवाळी ‘गोड’ होऊ देणार नाही!; कृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन 

News Desk