HW News Marathi
महाराष्ट्र

“मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार”, चित्रा वाघ यांनी मिटकरींना ,सुनावले

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या प्रकरणात पत्रकार परिषदेत शरद पवारांची आठवण काढत बाप आहे तो माझा असा उल्लेख केला होता. त्यावरुनच अमोल मिटकरी आणि चित्रा वाघ यांच्यात वाद झालाच होता तो पुन्हा एकदा समोर आला आहे.

सिंहाच्या तालमीतील वाघ केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणारे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं. मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, असं वाघ यांनी सुनावलं आहे

“अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

अमोल मिटकरी यांची टीका काय?“वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते.

शरद पारांच्या तालमीत तयार मग दिशाभूल करु नका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर चित्रा वाघ रोज पत्रकार परिषद घेऊन सरकारला दारेवर धरत आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं वाघ यांनी यापूर्वी अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. या पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्याचे बोलून दाखवले होते. याच मुद्द्यावरुन आज अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. “तुम्ही भाजपमध्ये गेल्या नसता तर देवेंद्र फडणवीस यांनीच किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असता, तुम्ही शरद पवार यांच्या तालमीत तयार झाल्या आहात. तुम्ही लोकांची दिशाभूल करु नका,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांच्यावर मिटकरी यांनी टीकेचा बाण सोडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या आजारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसेनेने फटकारलं!

News Desk

फडणवीसांना दिलासा, ‘त्या’ पुर्नविचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

swarit

पालघर, ठाण्यासह मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर

News Desk