HW News Marathi
महाराष्ट्र

चित्रा वाघ यांनी दबावापोटी भाजपत जाण्याची परवानगी मागितली !

मुंबई । “चित्रा वाघ यांनी दबावापोटी भाजपमध्ये जाण्याची परवानगी मागितली”, असे स्पष्ट विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार हे आज (२८ जुलै) पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधत आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या राजीनाम्याविषयी स्वतः शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत सध्या मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्षाचा आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

येत्या ३० जुलै रोजी चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी पक्षांतराचा निर्णय का घेतला ? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र, आता खुद्द शरद पवार यांनीच याबाबतचा खुलासा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा” – चंद्रकांत पाटील

News Desk

मी सादर केलेली वानखेडेंची कागदपत्रे खोटी निघाल्यास मंत्रिपद सोडेन; नवाब मलिकांची रोखठोक भूमिका!

News Desk

राज ठाकरे धावले उद्धव ठाकरेंच्या मदतीला, मोदींना पत्र लिहित केल्या ५ मागण्या

News Desk