मुंबई | पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरुन राजकीय वातावरण तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हा मुद्दा उचलून धरला असून महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर भाजपमधील काही नेत्यांना धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली आहे.
अशा धमक्यांना भिक घालत नाही’
पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच “धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो”, असं प्रत्युत्तरही चित्रा वाघ यांनी ट्विटरवर दिलं आहे.
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो
जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं👊@BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत?? संजय राठोडचे संरक्षण करण्यातं तर व्यस्त नाहीत ना ? संपुर्ण राज्याचे डोळे पूजा चव्हाण प्रकरणाकडे लागलेत आणि त्यावर गृहराज्यमंत्र्याची बोटभर ही प्रतिक्रिया नसावी हे आश्चर्यकारक आहे, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे दोन्ही गृहराज्यमंत्री कुठे गायब आहेत??
संजय राठोड चे संरक्षण करण्यातं तर व्यस्त नाहीत ना ???
संपुर्ण राज्याचे डोळे पूजा चव्हाण प्रकरणाकडे लागलेत आणि त्यावर गृहराज्यमंत्र्याची बोटभर ही प्रतिक्रिया नसावी हे आश्चर्यकारक आहे @CMOMaharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 15, 2021
भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवर दिली होती. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. समता नगर पोलिस चौकीत ही तक्रार केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही, असं आव्हानच भातखळकर यांनी धमकीचे फोन करणाऱ्यांना दिलं आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्यानंतर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि आता अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्यामुळे हे प्रकरण कुठल्या थराला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चित्रा वाघ, अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे”, असा इशाराच भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.