HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाही – अजित पवार

मुंबई | दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज (८ ऑक्टोबर) प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी माहिती दिली. कृषी कायदा आणि मंत्री कार्यपद्धतीबाबत आढावा घेण्यात आला आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून पवार साहेब आपली भूमिका मांडतील. कोरोनाची टेस्टिंग होत आहे, पॉझिटिव्ह संख्येपेक्षा बरे होणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा टप्पा पुढील काय असेल, यावर चर्चा झाली आहे. परतीच्या पावसाने काय परिणाम होईल या विषयावरदेखील चर्चा झाली, शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत विचार विनिमय झाल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांच्या फायद्याची भूमिका काय, याबाबत आम्ही चर्चा करू आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. कोरोना अद्याप पूर्ण आटोक्यात यायला तयार नाही. जीएसटी मीटिंग झाली, मला हजर राहता आलं नाही. जयंत पाटील या मीटिंगला उपस्थित होते. निर्मला सीतारामन यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. पुन्हा १२ किंवा १३ तारखेला पुन्हा मीटिंग होणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९ वर्षीय तरुणीवर नालासोपारामध्ये सामूहिक बलात्कार, एक जण पोलिसांच्या ताब्यात

Aprna

मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे !

News Desk

‘तर मास्तराच्या मुलाने हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली त्यांची चौकशी का होत नाही’-एकनाथ खडसे

News Desk