HW News Marathi
महाराष्ट्र

‘लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना’, पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

मुंबई। मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्कारप्रकरणी भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी खंत व्यक्त केली आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या अक्षरश: ढसाढसा रडल्या. त्यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अश्रू रोखता आले नाहीत.

माफ कर ताई आम्हाला

चित्र वाघ यांनी ट्विट करून त्यांची खंत व्यक्त केली आहे. “साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना नाही वाचवू शकलो तुला”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

“खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका.

हे मला सांगायचे गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षाच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले. आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिने स्वतःला संपवून टाकलं. साकीनाक्यातील महिला मृत्यूशी झुंज देत होती आणि आता तर तुम्ही तिला बघितलं, आपण काही करू शकलो नाही आहोत. आम्ही अलीकडे पलीकडे काही चालू शकले नाही आणि याच पद्धतीने त्याच्यामध्ये पद्धतीने या महिलेला मारले गेले ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही.

राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रोसिटी कायदा आणायला हवा, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे, तसाच महिला अॅट्रोसिटीचा कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला असून खैरानी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याची माहिती दिली. पोलिस तिथे पोहोचली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती महिला जखमी आढळली. तिला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवलेला आढळून आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

News Desk

एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही – अजित पवार

News Desk

विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी करणार

News Desk