HW News Marathi
Covid-19

‘माझी मैत्रीण लवकर बरी व्हावी’ चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांसाठी केली प्रार्थना !

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हाॅस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे.त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली होती,’गेले दहा दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.दोन दिवसांपासून प्रकृती सुधारणा न झाल्याने रूबी हॉल क्लिनिक,पुणे येथे उपचार घेत आहे,सध्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.मी आपल्या सर्वांचे प्रेम व काळजी समजू शकते लवकरच आजारातून बाहेर पडेल.’

 

रूपाली चाकणकर यांची तब्येत बरी व्हावी यासाठी सर्वस्तरांतून प्रार्थना केली जात आहे. राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष आणि सध्या भाजपात असलेल्या चित्रा वाघ यांनीसुद्धा ट्विट करत रूपाली चाकणकर लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना केली आहे. रूपाली चाकणकर विरूद्ध चित्रा वाघ हा कलगीतुरा नेहमी पाहायला मिळतो.मात्र सध्या राजकारण न करता मैत्रीचं उदाहरण देत चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यासाठी प्रार्थना केली.

चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की , माझी मैत्रिण जुनी सहकारी @ChakankarSpeaks हिला प्रकृती अस्वस्थतेमुळे रूबी हॉल क्लिनीक येथे दाखल केल्याचे समजले. लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन बरी हो हिचं परमेश्वराकडे प्रार्थना….🙏

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार

News Desk

…तर जानेवारीपासून महाराष्ट्रात लसीकरणाला सुरुवात करु – राजेश टोपे

News Desk

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

News Desk