HW News Marathi
महाराष्ट्र

‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, गृहमंत्र्यांच्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती औरंगाबाद दौऱ्यात गुन्हेगारांचं कोंडाळं असलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. राजकीय वर्तृळात यावरुन चर्चा सुरु झाली आहे. यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. याच फोटोवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या आहेत. ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यात गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघे जण फोटोत पाहायला मिळत आहेत. या फोटोवरुन चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. ट्विट करुन त्यांनी गृहमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.

बलात्कारी व गुन्हेगारांना “शक्ती” देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही पण गुन्हेगारांना बलात्काऱ्यांना बळ देण्यास मात्र तत्पर… ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

दरम्यान, यावर अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. ते असं म्हणाले की, चार दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर होतो. दौऱ्यावर असताना लोकं फोटो काढण्याचा आग्रह धरतात. अशावेळी कोण कुठल्या प्रवृत्तीचा आहे हे कळत नाही. पण यापुढे फोटो काढताना काळजी घेईन, असं स्पष्टीकरण गृहमंत्री देशमुख यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा सामना धीराने व योग्य नियोजन करून केला पाहिजे !

News Desk

‘शरद पवारांचा अनादर करणाऱ्या अध्यक्षांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार’- दिलीप मोहिते पाटील

News Desk

गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk