मुंबई | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात काही दिवसांपासुन ट्विट वॉर दिसत आहे. चित्रा वाघ यांच्या प्रत्येक ट्विटवर रुपाली चाकणकर त्यांना पलटवार करत आहेत. आता चित्रा वाघ यांनीही त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, अशा शब्दात नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ महाविकास आघाडीवर कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन हल्लाबोल करत होत्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर त्यांना प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार करत होत्या. मात्र वाघ यांनी चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलेलं नव्हतं. बुधवारी एक ट्विट करत त्यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. या ट्विटमध्येही त्यांनी चाकणकर यांचं नाव घेतलेलं नाही.
चित्रा वाघ यांचं ट्विट काय?
अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतील सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल
तर
व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतीलसूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 7, 2021
चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं उत्तर
“ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!” अशा शब्दात चाकणकर यांनी सुनावलं होतं.