HW News Marathi
महाराष्ट्र

‘महाविकास आघाडीत किती आलबेल हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुनच दिसतंय’!

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या गेल्या 2-3 दिवसांपासून मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यावरील भेटी वाढल्याचं पाहायला मिळालं. राऊतांच्या या भेटीगाठींमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काही मतभेत निर्माण झाल्याची, तसंच पवार नाराज असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या आणि प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे राऊत यांच्या येरझाऱ्यांवरुनच पाहायला मिळत अशल्याची खोचक टीका वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

“संजय राऊतांच्या अस्वस्थेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्या करण्यावरून दिसतचं आहे. एकच कोडं, कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना, ‘मी हरामखोर नाही’, हे कशाला सिद्ध करावं लागतंय? संजयजी, माझं एकच आवाहन आहे की, तुम्ही सहा आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”, असं ट्वीट करुन वाघ यांनी संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणारच, राऊतांचा दावा

शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचं व्यवस्थित सुरु आहे. केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात पण नाराज कुणीच नाही, असं राऊत यांनी आवर्जुन सांगितलं. अहमदाबादमध्ये कुणालाही भेटल्याचा इन्कार शरद पवार यांनी केलाय. मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. या दोन्ही बैठकांमध्ये काहीही राजकारण नसल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शुट आउट अ‍ॅंड हिमायतबाग: आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी

News Desk

लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला – मुख्यमंत्र्यांकडून मंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

News Desk

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna