HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी “ही” कोणाची जबाबदारी ?’

मुंबई | मुंबईसह उपनगरांमध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे, मुंबईतील सखल भागांसह उपनगरांमध्ये देखील अनेक भागांमध्ये काल सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे नेहमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे मुंबईची पुन्हा तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे लोकल सेवेसह रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून मुंबईकरांना यंदा देखील या समस्येमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान तब्बल १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र, मान्सूनच्या पहिल्या दोन दिवसातच या दाव्यावर पाणी फेरले आहे. तर, भाजप नेत्यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चारोळीतून निशाणा साधला आहे. ‘पावसाच्या येता सरी…मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ‘ही’ कुणाची जबाबदारी ?,’ असा खोचक टोला चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजू शेट्टी बिनबुडाचा लोटा’ शेट्टी, म्हणतात, कुणाची भाटगिरी करताय?

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक!

News Desk

विवा महाविद्यालयाची जागा आता कोरोनाच्या उपचारासाठी उपलब्ध

swarit