HW News Marathi
महाराष्ट्र

“सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, चित्रा वाघ यांचा सरकारवर हल्ला

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज(२४ ऑगस्ट) पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने त्यांना करण्यात अली आहे. त्यांच्या या अटकेनंतर भाजप नेते आणि मंत्री आक्रमक झाले असून ते सरकारवर निशाणा साधत आहेत. भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. चित्रा वाघ यांनीही थेट ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.

सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है

चित्रा वाघ यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला सुनावलं आहे. “सरकार हमसे डरती है…..पुलिस को आगे करती है”, असं पाहिलं ट्विट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नारायण राणेंना अटक केल्यामुळे भाजप नेत्यांनी आक्रमकतेचा पवित्र घेतला आहे.

अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो

आशिष शेलार यांनी ट्विट करत त्यांचा निषेध दर्शवला आहे. ““केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचा आम्ही निषेध आणि धिक्कार करतो. राज्यसरकार आणि शिवसेनेला गर्भीत इशारा देऊ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु. या प्रकरणामध्ये राज्यसरकार ज्या प्रकारे वागतंय अफगाणिस्तानमधले तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही हे महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करत आहेत. नारायण राणेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत नक्कीच संयम ठेवायला पाहिजे. त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्टपणे बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही आम्ही राज्यामध्ये बघत आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा. भाजपाचे कार्यालयाजवळ हे तमाशे चालू झाले तर भाजपा महाराष्ट्रभर तांडव करेल आणि त्याची जवाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहिल,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं

आशिष शेलार पुढे म्हणाले,“ज्याप्रमाणे ही कारवाई झाली आणि मंत्री अनिल परब यांची एक क्लिप बाहेर आली त्यामुळे आता तालिबानींपेक्षा ही भयंकर तालिबानी हे लोकं आता जमलेले दिसत आहेत. नारायण राणेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होणार असतील तर आता तुम्ही क्लिप दाखवताय तर आमच्याकडे सीडी आहे हे लक्षात ठेवा,” असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. पोलीस यंत्रणेचा दुरूपयोग करीत होत असलेल्या या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शर्जिल उस्मानी मोकाट आणि नारायण राणे यांना अटक! हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र !!!, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेने हा तमाशा बंद करावा

भाजपच्या कार्यालयाजवळ जे तमाशे चालू झाले तर भाजप महाराष्ट्रभर तांडव करेल, त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील. त्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपही व्हायरल झाली आहे. तालिबानींपेक्षाही भयंकर असं हे दिसतंय. मुळात राणे साहेबांनी स्वत: सांगितलं गुन्हा केला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत. सगळ्या सीडी मविआ नेत्यांच्या आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते एकमेकांवर गुन्हे दाखल करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना मोठा धक्का! सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला

Aprna

…म्हणून मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हणालो, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा!

News Desk

नाशिकच्या सुला वाईन्सची प्रेरणादायी वीजनिर्मिती

News Desk