मुंबई | भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या विरोधात काँग्रेसगचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही मेहबूब शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे.
तरीही मी बोलत राहणार
मेहबूब शेख यांनी तक्रार केल्यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा. पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलायं
महिलाअत्याचार करणार्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा
पण मी बोलत रहाणार..
लडेंगे..जितेंगे 👍 pic.twitter.com/fBH6DMlXFG— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 3, 2021
काय आहे प्रकरण?
औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.