HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘मी बोलत राहणार, लढेंगे और जीतेंगे’, चित्रा वाघांचं प्रत्युत्तर

मुंबई | भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या विरोधात काँग्रेसगचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही मेहबूब शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे.

तरीही मी बोलत राहणार

मेहबूब शेख यांनी तक्रार केल्यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा. पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.

 

 

Related posts

“भाजप बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ?”, काँग्रेसचा खोचक सवाल

News Desk

“महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे”, संजय राऊत कडाडले  

News Desk

‘१९ जुलैला होणाऱ्या ‘त्या’ ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित!

News Desk