सिंधुदुर्ग | राज्यभरात कोरोनामुळे ३१ मार्चपर्यंत सरकारने बंद घोषित केला आहे. त्यामुळे चाकरमानी आणि सामान्य माणसे गावी जायला निघाले आहेत पण अशा लोकांना भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी रोखले आहे. ‘सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडं येण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांनी मुंबईतच राहावे, अशी विनंती करणारी एक पोस्ट ट्विटरद्वारे नीतेश राणे यांनी केली आहे. ‘मुंबईतून लोक गावी गेले तर गावांमध्ये कोरोना व्हायरस पसरू शकतो, अशी भीती या पोस्टमधून त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रसह देशभरात सध्या कोरोना विषाणूने कहर केला आहे. सद्यस्थितीला मुंबईतही हा विषाणू झपाट्याने पसरत असून त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक नम्र विनंती
सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी कडे निघाले आहेत..
या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबई च्या घरी राहावे कारण गावी आल्यामुळे इथे virus पसरण्याची शक्यता आहे!
हि वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे!— nitesh rane (@NiteshNRane) March 20, 2020
दरम्यान, राज्य सरकारने १ली ते ८वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने शाळादेखील बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या कुटुंबासहीत आपापल्या गावी जायला निघाले आहेत. हीच चिंता लक्षात घेत गावी कोरोना पसरु नये म्हणून मुंबईकरांना राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून आवाहन केले आहे. ‘सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरीच राहावे, कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे! ही वेळ सुट्टीची नाही. आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची आहे,’ असे राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.