HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनासारख्या आपत्कालीन समयी शरद पवारांचाही सरकारला मदतीचा हात

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी आज (२१ मार्च) पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात कोरोना स्टेज २ वर असल्याची माहिती दिली. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३ वर गेल्यानंतर प्रत्येकाची चिंता वाढली आहे. याची चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही तितकीच आहे. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना फोन केला आणि २० मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे आणि केंद्र सरकार सगळी मदत करण्यास तयार आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांना भेटल्यानंतर संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपकरणे देण्यासाठी तयार आहे, पण या वैद्यकीय महाविद्यालयांना कोरोना चाचणीची किट उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत कायमच शरद पवार मदत करण्यासाठी तत्पर असतात. कोरोनाच्या या परिस्थितीतही शरद पवार लोकांच्या आणि सरकारच्या पाठीशी ठाम उभे आहेत. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांशी बातचीत केल्यानंतर शरद पवार स्वतः दुवा बनल्यामुळे समन्वय अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने आपल्याला चाचणीची परवानगी द्यावी, त्यासाठी केंद्राने किट द्याव्यात, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे. केंद्र सरकारने देशातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांसाठी एक सूचना जारी केली आहे. देशातील सर्व खाजगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना रुग्णालयात बेड शिल्लक ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विलगीकरण कक्ष, पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मास आणि अतिरिक्त मनुष्यबळ यांची तयारी ठेवावी, अशी सूचनाही सर्व आयुक्तांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, ‘विलगीकरण सुविधा निर्माण करण्यासाठी काही बेड राखीव ठेवण्यात यावेत. प्रत्येक खाजगी आणि सरकारी रुग्णालयासाठी हा नियम असेल. रुग्णालयांनी आवश्यक मनुष्यबळ, मास्क, ग्लोव्हज आणि इतर साहित्यांचा आढावा घ्यावा. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी सुचनाही आरोग्यमंत्र्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विशेष कायदा करा, अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा !

News Desk

जे मला धमकवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचा मी बाप आहे-संजय राऊत

News Desk

गोपिनाथराव नेहमी सांगायचे की, देवेंद्र…जीवनात मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करु नको

News Desk