HW News Marathi
Covid-19

UPSC कडून सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा स्थगित, २० मे रोजी होणार नव्या तारखेची घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा स्थगित केली आहे. यूपीएससी परीक्षा ३१ मे रोजी घेण्यात येणार होती. मात्र, २० मे रोजी देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.

देशात कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. युपीएससीची देशातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षेसाठी केंद्र ठरलेली असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्यांची जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासना परीक्षेच्या तयारी झाली नाही, अहवाल युपीएससला देते.

गेल्या २४ तासांत देशात तब्बल २,५५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४२,५३३ इतका झाला आहे. यापैकी २९, ४५३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत एकूण ११, ७०६ जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत. तर अत्यंत दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत १,०७४ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या आमदार आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना कोरोनाची लागण

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

News Desk

राज्यात आज १६ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk