HW News Marathi
Covid-19

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्याची प्रणाली विकसित करणार !

मुंबई | कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिकस्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमीत शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशारितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज (१९ मे) राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्यासाठी प्रणाली विकसित करावी लागेल, त्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

शाळा सुरु झाल्या नाही तरीही शिक्षण सुरूच राहील. यासाठी शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१८ मे) फेसबुक लाइव्हमध्ये म्हणाले. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु होऊ शकली नाही, तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाचा विचार करावाच लागेल. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरुम्स पर्याय वापरता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु शकली नाही तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाच विचार करावाच लागेल. विशेषतः कंटेन्मेंट झोन मधील शाळा बंद राहतील. मला महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचे नाही, असे उद्धव ठाकरे काल म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणार – किशोरी पेडणेकर

News Desk

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk

लोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्या! अन्यथा आंदोलनाचा भाजपचा इशारा

News Desk