HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी शपथविधी उरकण्यासाठी मिरची हवन केले होते?

मुंबई | कोरोनाच्या संकटातही राजकीय घडोमोडी या सुरुच आहेत. आरोप प्रत्यारोप हे सुरुच आहेत आज (१९ मे) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.सध्याचं सरकार कोरोनापासून बचाव करण्यास असमर्थ ठरत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी धुडकावून अजित पवारांसोबत सकाळी लवकर शपथविधी उरकण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मिरची हवन केले होते, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. त्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींवर आधारित ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात फडणवीसांनी केलेल्या मिरची हवनचा उल्लेख आहे.

सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ पुस्तक डिजिटल स्वरुपात प्रकाशित झाले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. बहुमताचा आकडा गाठलेल्या शिवसेना-भाजपामध्ये सत्तावाटपावरून निर्माण झालेला दुरावा, शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी, त्याला भाजपाचा असलेला विरोध यावरून महाविकास आघाडीची समीकरणं जुळली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे राज्यातल्या जनतेला वाटू लागले.

मात्र २३ नोव्हेंबरच्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत शपथविधी आटोपला. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाची पार्श्वभूमी, अजित पवारांचं बंड, त्यांची घरवापसी, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना दाखवण्यात आलेली आमिषं, या खेळातलं पडद्यामागचे खेळाडू, पवारांनी हलवलेली सूत्रं, या सगळ्या घडामोडींवर सूर्यवंशी यांनी पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ‘मिरची हवन’ केल्याचा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हवन करून घेतले होते. उत्तराखंडमधलंेहरीश रावत सरकार या ‘मिरची हवन’मुळे वाचल्याचे फडणवीसांना सांगितले होते. त्यामुळे फडणवीसांनी हे हवन केले होते. असाही दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणे म्हणजे अक्षम्य चुक – रोहित पवार 

News Desk

तब्बल 20 दिवसानंतर सीरियल किलरला घेतले बीड पोलिसांनी ताब्यात

Aprna

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल

News Desk