HW News Marathi
Covid-19

#NisargaCyclone : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसचे संकट असताना आता निसर्ग चक्रीवादळ नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रा सज्ज तर आहेत. राज्यात एनडीआरएफची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२ जून) रात्री ८ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळलाी आहे. तसेच हे चक्रीवादळ गोव्यापासून २८० किलोमीटर दूर आहे. तर मुंबईपासून ४३० किलोमीटर लांब आहे. उद्यापर्यंत (३ जून) हे चक्रीवादळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस कोकण ,मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदूबार, नाशिकमध्ये, पुणे घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच…”, बहिण पंकजाला कोरोना भाऊ धनंजय मुंडेची भावनिक पोस्ट

News Desk

कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना महाराष्ट्राबाबत मोदींनी व्यक्त केली चिंता

News Desk

….तर मुंबईत पुन्हा कोरोना संदर्भात कठोर निर्णय घेतला जाईल!

News Desk