HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका कीर्ती शिलेदार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची श्रद्धांजली

मुंबई | ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज (२२ जानेवारी) सकाळी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली असून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


संगीत रंगभूमीची व्रतस्थ शिलेदार – मुख्यमंत्री 

संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे. तसेच शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली”.

कीर्तीताई यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री 


“ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

News Desk

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk