HW News Marathi
महाराष्ट्र

मालाड इमारत दुर्घटना | मुख्यमंत्र्यांची मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला ५ लाखांची मदत जाहीर 

मुंबई | पश्चिम उपनगरातील मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी भागात चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन विचारपूस केली आहे. तसेच, शासनातर्फे मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना ५ लाखांची मदतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी भागात इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले. त्यांच्यावर कांदिवली परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मालाडच्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे. मोदी म्हणाले आहेत की, ‘मुंबईत मालाड पश्चिम इथे इमारत दुर्घटनेतील जीवीतहानीमुळे तीव्र दु:ख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनपेक्षा राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, मनसेचा सरकारला सल्ला

News Desk

तिढा सुटला ! वैद्यकीय महाविद्यालयातील मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा अध्यादेश जारी

News Desk

राजकीय दंगलीमुळे देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होईल!, राऊतांचे भाकीत

Aprna