HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली टास्क फोर्सची बैठक

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करण्यासाठी काल(१० एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तर आज (११ एप्रिल) मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करणार की निर्बंध कठोर करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. उद्धव ठाकरेंनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जनतेसाठी पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (११ एप्रिल) माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनला दुसरा पर्याय आहे का? असा सवाल केला. लोकांचा जीव वाचणं महत्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर, नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यास राज्यातील विरोधी पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल देखील त्यांनी केला. संजय राऊत यांच्या संवादातून महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

लॉकडाऊनपूर्वी लोकांचा विचार करा आणि आमदारांचा निधी कमी करत गरीबांना द्या, भाजपची भूमिका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी २ कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना ५ हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमीत भक्तांना जाण्यास बंदी, घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन 

News Desk

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासांत ६२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

News Desk

केंद्राच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे तोंड बंद ! रामदास आठवले

News Desk