HW News Marathi
Covid-19

शिवसेनेसारखं काम इतर राज्यांना जमलं नाही, म्हणून तिथे चिता पेटलेल्या आहेत !

मुंबई । “महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी कोविड यंत्रणा उभी करत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती चांगली आहे. इतर राज्यांमधील पक्षांना मात्र ते जमलं नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात शिवसेनेतर्फे ३ कोविड सेंटर उभारण्यात आली असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कोविड सेंटर्सचे उदघाटन झाले. यावेळी संजय राऊत बोलत होते.

राज्यात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी कोविड यंत्रणा उभी करत असल्याने कोरोनास्थिती नियंत्रणात असल्याचे सांगताना संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यामध्ये ज्या ३ कोविड सेंटरचं उद्घाटन केलं ती सरकारी नसून शिवसेनेच्या माध्यमातून उभी केली आहेत. महारष्ट्राची स्थिती चांगली असण्याचे हे कारण आहे की सरकारला समांतर अशी कोविड सेंटर आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभे करत आहेत. यामुळे सरकारवरचा भार कमी होतो. अन्य राज्यांमध्ये मात्र तसे होत नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आज चिता पेटलेल्या दिसत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलंय !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत, “राज्य सरकारने आकड्यांची बनवाबनवी तात्काळ थांबवावी” असे म्हणत आरोप केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. अशाप्रकारचे वक्तव्य करणं हे बहुधा विरोधी पक्षाच्या कार्याचा भाग असेल. मात्र, फडणवीसांच्या या आरोपांना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातील ६ सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह

swarit

“सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?”, फडणवीसांनी डिवचले

News Desk

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा

News Desk