HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यामूळे मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई | मुंबईतील वीजपुरवठा आज (१२ ऑक्टोबर) अचानक खंडित झाला होता. सर्व काही ठप्प झाले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी ४ वाजता वर्षा येथे महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत.

मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या होत्या. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकारने मारली पलटी, मल्टीफ्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम

News Desk

भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ?

News Desk

राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी! – मुख्यमंत्री

Aprna