HW News Marathi
महाराष्ट्र

लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला – मुख्यमंत्र्यांकडून मंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. याच संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘देश हाच देव’ मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. ८६ वर्षांच्या परंपरेला यावर्षी खंड पडणार असला तरी यावेळी हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

मंडळाकडून यावर्षी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक केले आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे, असे ट्विट उद्धव ठाकरेंनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता परमबीर सिंग यांची वेळ, हजर व्हावे लागणार ईडीच्या दारी!

News Desk

प्रताप सरनाईकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा,किरीट सौमय्यांसह भाजप नेत्यांचं ठिय्या आंदोलन !

News Desk

पेरण्या करण्याची घाई करु नका, मुख्यमंत्र्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला

News Desk