HW News Marathi
Covid-19

आता जास्त वेळ न घालवता केंद्राने मराठा समाजाला न्याय द्यावा ! । मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा दणका देत मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल जाहीर केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर अनेक आरोपप्रत्यारोप झाले आणि राज्यभर हा मुद्दा चांगलाच गाजला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर, आज (५ मे) थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना एक प्रकारे आपल्याला मार्गच दाखवला आहे की, हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे मार्गदर्शन. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणासाठी मी हात जोडून विनंती करतो. हा अधिकार केंद्राचा आहे म्हटल्यावर आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो की केंद्राने मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे :

* मराठा आरक्षणाची लढाई आपण न्यायालयात लढत होतो. सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता.

* दुदैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निराशाजनक निकाल लागला आहे.

* एकमुखाने घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालय हा निकाल दिला.

* निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला ?

* मराठा समाजाला माझे मनःपूर्वक धन्यवाद. समाजाने या निर्णयाविरोधात कोणताही थयथयाट न करता सामंजस्य दाखवले आहे.

* सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की हा राज्य सरकारचा अधिकारच नाही.

* सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना एक प्रकारे आपल्याला मार्गच दाखवला आहे की, हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा आहे.

* सर्वोच्च न्यायालयाचे हे मार्गदर्शन. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणासाठी मी हात जोडून विनंती करतो.

* हा अधिकार केंद्राचा आहे म्हटल्यावर आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो की केंद्राने मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यावा.

* उद्या मी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना अधिकृत पत्रही लिहिणार आहे. हवंतर भेट देखील घेईन.

* केंद्राच्या या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे.

* जास्त वेळ न घालवता केंद्राने निर्णय घ्यावा.

* सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र आणि मुंबईच्या कोरोना लढ्याचे कौतुक

* कोरोनारूग्णसंख्या खाली येऊ लागली आहे. मात्र गाफीलपणा परवडणार नाही.

* गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर

* केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला आहे. देशात तिसऱ्या लाटेची भीती

* १२ कोटी डोस एकरकमी विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

* तिसऱ्या लाटेसाठी आपण तयारी सुरू केलेली आहे.

* सद्यस्थितीत १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती. आपल्यापुढे ३००० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष

* महाराष्ट्राचे ‘मिशन ऑक्सिजन’. ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झालाच पाहिजे.

* आतापर्यंतचा संयम आणि शांतता पुढेही दाखवा.

* समाजविघातक वृत्तीपासून लांब राहा आणि सरकारवर विश्वास ठेवा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोरोनाची लागण

Aprna

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेलवर पुण्यात कारवाई!

News Desk

शरद पवारांनी घेतला पुढाकार ! ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडवण्यासाठी ‘या’ सूचना

News Desk