HW News Marathi
Covid-19

कोरोना हॉटस्पॉट भागातील सर्वाधिक रुग्ण बरे, तर आतापर्यंत ७६८८ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई | कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. राज्यात आज (१७ मे) एक दिवसात २ हजार ३४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३३, ०५३ अशी झाली आहे. राज्यात एकूण २४ हजार १६१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत दुसरी दिलासादायक बाब म्हणजे आज आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७६८८ एवढी आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत. या हॉटस्पॉट असलेल्या भागातील सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१७ मे) दिली.

केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहिर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना १४ दिवसांऐवजी दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या देखील वाढली आहे.

गेल्या १० मे रोजी ३९९ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ११ मे रोजी ५८७, १२ मे रोजी ३३९, १३ मे रोजी ४२२, १४ मे रोजी ५१२, १५ मे रोजी ५०५, १६ मे रोजी ५२४ आणि आज १७ मे रोजी ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये ३७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत ७६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यातील ५० टक्के रूग्ण हे १० ते १७ मे या कालावधीतील आहेत. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.

या तारखेनुसार बरे झालेल्या रुग्णांची माहिती

  • २७ मार्च – २४
  • २८ मार्च -२६
  • २९ मार्च – ३५
  • ३० मार्च – ३९
  • ३ एप्रिल – ५०
  • ४ एप्रिल- ५२
  • ५ एप्रिल – ५६
  • ६ एप्रिलला- ६६
  • ७ एप्रिल – ७९
  • ८ एप्रिल – ११७
  • ९ एप्रिल – १२५
  • १० एप्रिल – १८८
  • ११ एप्रिल – २०८
  • १२ एप्रिल – २१७
  • १३ एप्रिल – २२९
  • १४ एप्रिल – २५९
  • १५ एप्रिल – ३६
  • १६ एप्रिल – ५
  • १७ एप्रिल – ३१
  • १८ एप्रिल – ३४
  • १९ एप्रिल – १४२
  • २० एप्रिल – ६५
  • २१ एप्रिल – १५०
  • २२ एप्रिल – ६७
  • २३ एप्रिल – ५१
  • २४ एप्रिल – ११७
  • २५ एप्रिल – ११९
  • २६ एप्रिल – ११२
  • २७ एप्रिल – ९४
  • २८ एप्रिल – १०६
  • २९ एप्रिल – २०५
  • ३० एप्रिल – १८०
  • १ मे – १०६
  • २ मे – १२१
  • ३ मे – ११५
  • ४ मे – ३५०
  • ५ मे – ३५४
  • ६ मे – २७५
  • ७ मे – २०७
  • ८ मे – १६९
  • ९ मे – ३३०
  • १० मे – ३९९
  • ११ मे – ५८७
  • १२ मे – ३३९
  • १३ मे – ४२२
  • १४ मे – ५१२
  • १५ मे – ५०५,
  • १६ मे – ५२४
  • १७ मे – ६००

राज्यात एकूण – ७६८८ रुग्ण बरे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात दाखल, कारण अद्याप अस्पष्ट

News Desk

आता कोणाला सांगणार ‘ही’ राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk