HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सातारा दौऱ्यावर पावसाचं सावट

सातारा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२६ जुलै) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांच्या सातारा दौऱ्यावर पावसाचं सावट आलं आहे. कोयनानगरमधून ते हेलिकॉ्पटरने साताऱ्यासाठी रवाना झाले होते. मात्र, अतिमुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर उतरवण्यास जागा न मिळाल्याने पुण्याला ते माघारी परतले आहेत. याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. कोयनानगर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, काल (२५ जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपणळूणचा दौरा केला होता.

राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा उपलब्ध करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दावा

राज्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरं उध्वस्त झाली आहेत, अनेक लोकांना जीव गमवावा लागलं आहे. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु. अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधितांना योग्य ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे .

राज्याचा आढावा घेऊन मदत करू

चिपळूणातच नुकसान झालं नसून राज्यात झालं आहे, त्यामुळे राज्यात पाहणी करून मगच सरकार मदत करेल, असं त्यानं सांगितलं आहे. दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न औषध कपडेलत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत उद्या दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र त्यांचा दौरा असणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तात्काळ मदत केली जाईल असं दुर्घटनाग्रस्त नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तर लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही, कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांचा अंदाज घेऊनच सरकार मदत करेल आणि आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

विमा असेल नसेल मदत करा

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना असे देखील म्हणाले दुर्घटनाग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न असेल आणि ज्यांच्याकडे विमा आहे त्यांना मदत करा आणि नसेल तरीही मदत करा असे देखील म्हणाले अर्थव्यवस्था सध्या मंदावली आहे आणि सरकारची देखील अर्थव्यवस्था मंदावली आहे तर सगळ्यात आधी केंद्राकडे मागणी करणार नाही पश्चिम महाराष्ट्राची मागणी केल्यानंतरच केंद्राकडे मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे

चिपळूणच्या दौर्यावर असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेदेखील म्हणालेत आज पर्यंत मी हवामान बदलांबद्दल ऐकत आलोय मात्र आता चटके पाहायला मिळतात आणि ही सगळी परिस्थिती, वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे असे देखील ते म्हणाले. तर वर्षानुवर्षे बसलेल्या गावांवर दरडी कोसळत आहे आणि आता पाऊस देखील मी अनुभवला तो पाउस नाही तर अतिवृष्टी भयानक याला म्हणता येईल असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळोवेळी पाठ पुरावा केल्यामुळेच ‘वैद्यनाथ’ला थकहमी मिळाली, इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही – पंकजा मुंडे

News Desk

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

News Desk