HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा मातोश्रीची चिंता वाढली ! तेजस ठाकरेंच्या २ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण 

मुंबई | राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर देखील कोरोना संसर्गाचे वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या २ सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तेजस ठाकरे यांना व्हाय प्लस सुरक्षा आहे. त्यापैकी २ सुरक्षा रक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने इतर सुरक्षा रक्षकांची देखील चाचणी करण्यात आली असून त्यांना क्वॉरंटाईनही करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वरून यापूर्वीही कोरोना संसर्गाच्या बातम्या आल्या आहेत. सर्वात आधी ‘मातोश्री’ परिसरातील एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर, ‘मातोश्री’वर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेले ३ पोलिसही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. या प्रकारानंतर अन्य सर्व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करून त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा मातोश्रीची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक करण म्हेत्रेंचे निधन, सोलापुरात अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी

News Desk

मी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली, माझा विजय झाला !

swarit

मिलिंद एकबोटेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk