HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री टप्प्याटप्प्याने बोलणार – अनिल परब

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आले. या भेटीनंतर काल (२७ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) शिवसेना आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर, शरद पवार-मुख्यमंत्री भेट आणि आता शिवसेना आमदारांसोबत चर्चा या सगळ्यामूळे नेमकी काय सुरु आहे याचा विविध पद्धतीने अंदाज लावले जात आहेत.

दरम्यान, या भेटीबाबत शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांशी नव्हे तर टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे, आश्वासने कशी पूर्ण करायची, आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आमचा वचननामा आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रासमोरील प्रश्न जाणून तो सोडवण्याबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीवरही अनिल परब यांनी भाष्य केले आहे. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र असले तरी कोणत्याही पक्षाची बातमी त्यात लागू शकते, कोणाची मुलाखत घ्यायची हा संपादकांचा अधिकार आहे. फडणवीस भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत कुठेही अस्वस्थता नाही, शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच असा खुलासाही अनिल परब यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कधी करणार?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला… शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

Adil

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगळा विचार सुरू !

News Desk