HW News Marathi
मुंबई

लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा सखोल अभ्यास

संगीत हे आपल्या आयुष्याचा एक अभिवाज्य घटक आहे, त्या शिवाय कोणाचे हि आयुष्य अपुरेच. शास्त्रीय संगीत असो लोक संगीत असो किंवा हल्लीचे नवनवीन प्रकार असोत, संगीतकार त्यांच्या व समाजाच्या भावना या माध्यमातून उत्तम रित्या सादर करीत असतो. या मधुर संगीताचा प्रेक्षकांच्या आयुष्यावर होणारा सुरेख असा परिणाम कोणीही नाकारू शकत नाही, त्यात हि अधोरेखित करण्यासारखे संगीत म्हणजे २०व्या शतकात लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजत सादर झालेली गाणी.

यापूर्वी देखील लता मंगेशकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशोगाथा मांडणारी अनेक पुस्तके आली, पण आता पहिल्यांदाच त्यांच्या संगीताचा सखोल अभ्यास आपल्या समोर येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवरील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा लोकांवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारे ‘काला संगम’ या पुस्तकाचे लेखक अजय देशपांडे यांनी यावेळी लता मंगेशकरांच्या गाण्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. या पुस्तकात पुस्तक लताजींच्या शास्त्रीय बंदिश, भजन, गीत, तराणा, दादरा, लॉरी, ठुम्रि, मुजरा आणि गझल इत्यादींचा याच बरोबर लतादीदींच्या संगीताच्या अनेक घटकांचा सखोल अभ्यास आहे.आज लतादीदींच्या ९१व्य वाढदिवस निमित्त अजय यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदर्शित केले आहे आणि लवकरच लता श्रुती संवाद हे पुस्तक देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ट्री गणेशा’च्या रूपात बाप्पा राहणार आपल्यासोबत

swarit

महागाईविरोधात शिवसैनिकांची सरकार विरोधात आंदोलन

News Desk

Dahi Handi | युवा जिद्दी मराठा पथकाची महाराष्ट्र पोलिसांना सलामी

News Desk