HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आज नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर जाणार

नंदुरबार | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (१९ मार्च)) नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ते नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगाव येथील आरोग्य केंद्रांची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक आणि नंदुरबार दौऱ्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही सोबत असणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला नाशिकमधील ओझरहून सुरुवात होणार आहे. तिथून ते नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगांमध्ये असलेल्या मोलगी आणि धडगावला जातील. कोरोना लसीकरणाच्या संदर्भातील माहिती घेऊन उद्धव ठाकरे स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

तसेच, सुरवानी येथे सुरु असलेल्या वीज वितरण उपकेंद्राच्या कामाची पाहणीही उद्धव ठाकरे यावेळी करणार आहेत. त्यानंतर धडगाव येथील रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणाच्या संदर्भातील माहिती घेऊन ते वन विभागाच्या रोप वाटिकेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Aprna

राज्यातील सत्तापेचादरम्यान राज्यपालांच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

News Desk

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk