HW News Marathi
Covid-19

सण साधेपणाने साजरे करा ! मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना होळी, धुळवडीच्या शुभेच्छा अन् आवाहन

मुंबई । यंदाही अन्य सणांप्रमाणे होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्य सरकारकडून काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून आजचा (२८मार्च) होळी आणि धूलिवंदनाचा (२९ मार्च) सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देतानाच खबरदारीचे आवाहनही केले आहे.

https://www.facebook.com/1426708644212112/posts/2911872455695716/

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला उद्देशून म्हणतात की, “परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो.”

पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना “या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया” असे आवाहन करत राज्यातील जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोकळ घोषणा देणारे माहविकासआघाडीचे सरकार नाही | मुख्यमंत्री

News Desk

जागतिक बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर

News Desk

कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत; पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Aprna