HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

विठुमाऊली चमत्कार दाखव,हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं? मुख्यमंत्र्यांच साकडं

पंढरपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची आज (१ जुलै) पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे हे दांपत्य ठरले आहे.

माऊलीला मुख्यमंत्र्यांनी साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं? त्यामुळे लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी मनापासून त्यांनी प्रार्थना केली.

मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे , असं सांगत त्यांनी विठुरायाची पूजा करण्याचा मान मिळाला त्याबाबत आभार मानले. शासनातर्फे पंढरपूर नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचे यात्रा अनुदान देखील देण्यात आले.

Related posts

शाळेत शिकणा-या मुलीकडे देशी कट्टा

News Desk

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच !

News Desk

बळीराजा आजपासून १० दिवसीय संप

News Desk