HW News Marathi
Covid-19

‘पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु होणार’, महापौर मुरलीधर मोहोळांची माहिती

पुणे | राज्यात कोरोनाचा कहर वाढत होताच. पुण्यातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होती. मात्र, आता हळूहळू कोरोना रुग्ण संख्या पुण्यातील कमी होत चालली आहे. पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट वाढत आहे. यामुळे सोमवारपासून पुण्यात नवीन नियम लागू करण्यात आले होते. नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळं बंद राहील. पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोचिंग क्लासेसना परवानगी

कोरोना काळामध्ये मुलांमध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात शालेय व महाविद्यालयीन परीक्षा सुद्धा रद्ध करण्यात आल्या. मात्र स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात यावेळी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स 7 ते दु 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.

पुण्यात नेमकं काय सुरु आहे?

– सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

– अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.

मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

– उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

– खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.

– अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.

– लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक

– अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

– पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी

– कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही !

News Desk

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊच नयेत; प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणुका घ्या

Aprna

“लॉकडाउन आवडे सरकारला”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

News Desk