HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपुरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकरांना पोलिसांकडून अटक

पंढरपूर | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी देखील आषाढी वारी पायी घेऊन न जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली. तसेच स्थानिक आमदार महेश लांडगे हेदेखील त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे.

सध्या मंगल कार्यालयाबाहेर काही समर्थक ठिय्या देऊन बसले आहेत. यावर आता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र, सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मज्जाव करण्यात आला आहे.

१० मानाच्या पालख्या कोणत्या?

१- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

२- संत तुकाराम महाराज (देहू)

३- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

४- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

५- संत सोपान काका महाराज (सासवड)

६- संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७- संत एकनाथ महाराज पैठण

८- रुक्मिणी माता (कौडानेपूर) अमरावती

९- संत निळोबाराय (पारनेर अहमदनगर)

१०- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा थांबणार? 

News Desk

भाजपा सरकारविरोधात मत व्यक्त केले तर कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का ? – अतुल लोंढे

Aprna