June 26, 2019
HW Marathi
महाराष्ट्र

मुंबई आणखी गारठणार, तापमानात थेट १० अंशांची घट

मुंबई । उत्तरेकडून वाहणारे वारे, दिल्लीमध्ये झालेली गारपीट, वाऱ्यांची बदलती दिशा यामुळे राज्य चांगलेच गारठले आहे. राज्याच्या तापमानात प्रचंड घट झाली आहे. गेल्या चार दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावरून थेट २४ अंशावर घसरल्याने कमाल तापमानात तब्बल १० अंशाची घट झाली आहे. शुक्रवारी मुंबईत १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत रात्रीच नव्हे तर दिवसाही कमालीची थंडी जाणवत आहे.

महाबळेश्वरमध्ये राज्यात सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाबळेश्वर येथे ९ अंश सेल्सिअस कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत शनिवारी आणि रविवारी मुंबईचे किमान तापमान १३ अंशाच्या जवळपास राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण, गोव्यासह मराठवाड्यात ११ ते १२ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (९ फेब्रुवारी) मात्र गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. तर, १० फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई मात्र आकाश निरभ्र राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झोपुच्या ‘आसरा अ‍ॅप‘चा शुभारंभ

Gauri Tilekar

भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

News Desk

गणेशोत्सवा दरम्यान चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष भेट

News Desk