HW News Marathi
महाराष्ट्र

“खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत”, भाजपचा घणाघात

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर छापा टाकत आज (२५ जून) ईडीने कारवाई केली. त्यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा झपाटाच लावला आहे. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. अशा आशयाचं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याचंही म्हटलं आहे. ते म्हणतात, आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे.

११ मे ला ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे संशयित रुग्ण, संपूर्ण परिसर सील

swarit

पहाटे तीनपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत रांगेत उभा होता..

News Desk

“किती काळ विरोधी पक्षात बसणार?”, फडणवीसांनी हसत दिले उत्तर

News Desk