मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी कोल्हापूरातील एका सभेत शिवसेनेला ‘गांडुळाची अवलाद’ अशी उपमा दिली. ‘गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही’, असे ते म्हणाले होते. अजित पवार यांच्या टीकेला शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर निशाणा साधला.
सामनाच्या संपादकीयमध्ये काय म्हटले
गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनीबोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडालाआहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठीनक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणीमागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्यासापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.