मुंबई। प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे. संघाची तुलना तालीबानशी करणं हा नियोजीत षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भुमिका घेत कुटनितीनं हिंदुत्वाशी तुलना करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी?, असा सवाल राणेंनी केला आहे.
हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय
कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या सासुसरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव आहे. जो व्यक्ती जिथ राहतो त्यावर प्रेम करतो. मग त्याचा धर्म आणि उपसना पद्धती कोणतीही असली तरी तो आमच्यासाठी हिंदूच आहे. हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.तुम्हाला महिलांच्या हक्काबद्दल किती माहिती आहे? ट्रिपल तलाकच्या वाईट परंपरेवर तुम्ही कुठे होता?, असा सवाल करतानाच तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो. कोणतही सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरूम निवडा या मुद्द्यावर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अन्यथा बिनशर्त माफी मागा, असंही त्यांनी म्हटलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंद दल अफगाणिस्तानमधील तालिबान सारख्याच कट्टरतावादी संघटना आहेत. या संघटनांच्या मार्गात भारताचं संविधान अडसर ठरत आहे. यांना थोडीशी जरी संधी मिळाली तर हे कोणताही संकोच बाळगणार नाहीत. भारतात अल्पसंख्यांक समाजासोबत झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटना म्हणजे तालिबानसारखं बननण्याआधीची रंगीत तालिम आहे. हे सर्व लोक एकच प्रकारचे आहेत. यांची केवळ नावं वेगळी आहेत.”
दरम्यान, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनीही जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. जावेद अख्तर यांनी चुकीचं विधान केलं असून त्यांनीच तालिबानमध्ये जावं, असा अजब सल्ला कपिल पाटील यांनी दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.