HW News Marathi
महाराष्ट्र

‘तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त’, आशिष शेलारांची टीका!

मुंबई। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सोमय्यांना रोखण्याचे आदेश या पार्श्वभूमीवर भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप शेलार यांनी केलाय.

कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सोमय्या कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात होते. त्यावेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. राज्य अराजकतेकडे जात आहे. पत्रकार, संपाद, जाणकार, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करुच, पण आता सर्वसामान्य नागरिकांनी बोलणं गरजेचं असल्याचं शेलार म्हणाले.

मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का?

किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं की अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घावून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का? असा सवालही शेलारांनी केलाय. नोटीस म्हणून जी दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. इतकी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली असं सांगितलं जातं त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी

गुन्हे गार कोण हे माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे माहिती आहे, तो कुठल्या पक्षाचा हे ही माहिती आणि मग कारवाई कुणावर आणि अटकाव कुणाला करताय? एकप्रकारे सरकारी यंत्रणेनं गुन्हा केला आहे. काही बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं गेलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज शेलार यांनी भाजपच्या वतीनं केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते !

News Desk

राज्यातील दोन वेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी भेटणे म्हणजे अपराध नाही, राऊतांचे फडणवीसांच्या भेटीवर स्पष्टीकरण

News Desk

मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा परफेक्ट कार्यक्रम सुरुच, राऊतांचा भाजपला टोला

News Desk