HW News Marathi
महाराष्ट्र

मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई | दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेत. तसेच दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावरही गुन्ह दाखल करण्या आला आहे. डेलकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी काल मला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल मोदींचे सहकारी, देशमुखांचा हल्ला

दरम्यान, काल(९ मार्च) अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरमावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं देशमुख म्हणाले होते. त्यावरून सभागृहात एकच गदारोळ माजला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार जाहिर

News Desk

मुंबई डबेवाल्यांच्या मदतीला रोहित पवार पुढे सरसावले

News Desk

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमारला २ दिवस पोलीस कोठडी

News Desk