HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस आता महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ नेत्यावरही हक्कभंग दाखल करणार

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (१० मार्च) शेवटा दिवस आहे. अधिवेशमाच्या पहिल्यादिवसापासून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सत्ताधारी पक्षांना वेठीस धरले होते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत घेतला आहे. संजय राठोड, मनसुख हिरेन प्रकरणात फडणवीसांनी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. सरकारच्या मंत्र्यांनादेखील फडणवीस अडचणीत आणत आहेत.

दरम्यान, आज फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.

‘मराठा आरक्षणाच्या विषयात सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज खोटं निवेदन केलं. १०२ ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. ऍटर्नी जनरलसंदर्भात त्यांनी चुकीचं विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे’, असं फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं. ‘मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना ऍटर्नी जनरलनी पाठिंबा दिला. पण चव्हाणांनी ऍटर्नी जनरलच्या विरोधात चुकीची माहिती दिली,’ असा दावा त्यांनी केला आहे.

अनिल देशमुखांविरोधातही देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. तसेच, या आधीही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हक्कभंग दाखल केला होता. अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं १५ डिसेंबर २०२० रोजी आश्वासन दिले होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिमांना गीता, तर हिंदूंना कुराण भेट

News Desk

मनसे नेत्यांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; आंदोलकांना बुलढाण्यातून बाहेर काढण्यास सुरुवात

Aprna

#Coronavirus : राज्य सरकारला ‘या’ खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit